धनुष्यबाण

शिवसेना

हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे

प्रशिक्षण व मतदान पुनर्निरीक्षण (SIR)
महाअभियान

बाळासाहेब ठाकरे

हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे

अल्प परिचय
  • पूर्ण नाव: बाळ केशव ठाकरे
  • जन्म: २३ जानेवारी १९२६ पुणे
  • निधन: १७ नोव्हेंबर २०१२ मुंबई
  • व्यवसाय: व्यंगचित्रकार, राजकारणी
  • संस्थापक: शिवसेना (१९६६) - मराठी माणसासाठी लढा व हिंदुत्व विचारसरणीवर आधारित पक्ष उभारला.
  • ओळख: हिंदुहृदय सम्राट म्हणून प्रसिद्ध. ठाम आणि स्पष्ट हिंदुत्व.
  • व्यंगचित्रातून जनजागृती - 'मार्मिक' साप्ताहिकाद्वारे राजकीय भाष्य.
  • निर्भीड नेतृत्व शैली - थेट, स्पष्ट व प्रभावी वक्तृत्व.

त्यांच्या नावाने चालणाऱ्या प्रमुख शासकीय योजना:

  • बाळासाहेब ठाकरे आरोग्य योजना
  • बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना
  • बाळासाहेब ठाकरे वाहन चालक विमा योजना
  • बाळासाहेब ठाकरे शेतकरी योजना
  • बाळासाहेब ठाकरे आवास योजना
  • बाळासाहेब ठाकरे शिष्यवृत्ती योजना
बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रभावी व करिश्माई व्यक्तिमत्व होते.
त्यांनी मराठी अस्मिता व हिंदुत्व या दोन प्रमुख आधारांवर मोठी चळवळ उभी केली.
त्यांच्या नावाने अनेक योजना राबवून समाजातील विविध घटकांना मदत केली जात आहे.

आनंद दिघे

धर्मवीर आनंद दिघे साहेब

अल्प परिचय
  • पूर्ण नाव: आनंद चंद्रकांत दिघे
  • ओळख: धर्मवीर (जनतेने दिलेला किताब)
  • कार्यक्षेत्र: ठाणे व आसपासचा परिसर
  • निधन: २६ ऑगस्ट २००१

कार्यपद्धती आणि नेतृत्व शैली:

आनंद दिघे साहेबांची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांचा जनसंपर्क आणि लोकांशी थेट नाळ जुडलेली होती. ते कोणत्याही पदावर नसतानाही लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी २४ तास उपलब्ध असत.

  • जनता दरबार पद्धत: लोक थेट येऊन समस्या मांडत.
  • त्वरित निर्णय क्षमता: प्रश्न तात्काळ सोडवण्यावर भर.
  • साधी जीवनशैली - सामान्य माणसासारखे राहणे.

त्यांच्या नावाने चालणाऱ्या योजना:

  • धर्मवीर आनंद दिघे शिक्षण सहाय्यता योजना
  • धर्मवीर आनंद दिघे सामाजिक सहाय्यता योजना
  • धर्मवीर आनंद दिघे अपघात मदत योजना
  • धर्मवीर आनंद दिघे आरोग्य सेवा योजना
आनंद दिघे साहेबांचा वारसा आजही ठाणे आणि महाराष्ट्रात जिवंत आहे. त्यांच्या कार्यशैलीचा प्रभाव पुढील नेत्यांवरही दिसून येतो, विशेषतः शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ भाई शिंदे उपमुख्यमंत्री यांच्यावर, जे त्यांचे शिष्य मानले जातात.
त्यांच्या स्मरणार्थ अनेक सामाजिक उपक्रम, आरोग्य शिबिरे आणि सेवा कार्य आजही चालू आहेत. आणि हेच विचार आपल्याला पुनश्च एकदा जन माणसांमध्ये रुजवायचे आहेत म्हणून दिघे साहेबांचा विचार पेरण्याचा आपण प्रयत्न करू.

एकनाथ शिंदे साहेब

उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे साहेब

राजकीय प्रवास
  • पूर्ण नाव: एकनाथ संभाजी शिंदे
  • जन्म: ९ फेब्रुवारी १९६४
  • कार्यक्षेत्र: ठाणे
  • पद: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, सध्याचे उपमुख्यमंत्री
  • गुरु: धर्मवीर आनंद दिघे साहेब
  • सुरुवात: शिवसेनेत सामान्य कार्यकर्ता म्हणून सुरुवात, पुढे नगरसेवक, आमदार, मंत्री आणि मुख्यमंत्री.

मुख्यमंत्री असताना घेतलेले महत्त्वाचे निर्णय (२०२२ - २०२४):

  • पायाभूत सुविधा: मुंबई व महाराष्ट्रात रस्ते, पूल, मेट्रो प्रकल्पांना गती. समृद्धी महामार्ग व कोस्टल रोड.
  • गृहनिर्माण: झोपडपट्टी पुनर्विकास (SRA) व म्हाडा प्रकल्पांमध्ये पारदर्शकता आणि गती.
  • शेतकरी हित: पीक विमा सुधारणा, नैसर्गिक आपत्ती मदत.
  • योजना: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना विस्तार.

हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे
प्रशिक्षण महाअभियान

कार्यपद्धती (SOP)
  • हे महाअभियान महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येईल.
  • प्रत्येक जिल्ह्यात पूर्व व पश्चिम अशा दोन ठिकाणी शिबिरांचे आयोजन करण्यात येईल.
  • दर महिन्याला एकाच जिल्ह्यात महाअभियान राबविण्यात येईल.
  • संपूर्ण महिनाभर:
    • सोशल मीडियाद्वारे प्रचार व प्रसार.
    • शिवसैनिकांमध्ये जागृती अभियान राबविण्यात येईल.
  • शिबिरासाठी उपस्थित राहणाऱ्या शिवसैनिकांची ऑनलाइन QR कोडद्वारे नोंदणी करण्यात येईल.
  • या महाअभियानात संबंधित जिल्ह्यातील खालील मान्यवर सहभागी राहतील:
    • मंत्री महोदय, खासदार, आमदार
    • जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख
    • इतर आघाड्यांचे पदाधिकारी आणि सर्व शिवसैनिक
  • प्रत्येक शिबिराचा कालावधी ३ तासांचा असेल.
  • शिबिराची तारीख व वेळ जिल्ह्यातील मंत्री, खासदार व आमदार यांच्याशी समन्वय साधून निश्चित करण्यात येईल.
  • शिबिरात सहभागी होणाऱ्या प्रत्येक शिवसैनिकाला ओळखपत्र (ID Card), नोटपॅड आणि पेन देण्यात येतील.
  • प्रत्येक शिवसैनिकाला १०० घरांमध्ये भेट देऊन खालील साहित्य वाटप करण्याचे उद्दिष्ट दिले जाईल:
    • पक्षाचे पॅम्प्लेट
    • ब्रोशर
    • PPT (डिजिटल स्वरूपात)
  • विशेष सॉफ्टवेअरच्या माध्यमातून प्रत्येक शिवसैनिकाने:
    • किती घरांना भेट दिली
    • किती साहित्य वाटप केले
    याची अपडेट माहिती (ट्रॅकिंग) घेतली जाईल.
  • शिवसैनिकांचा सन्मान: तालुकानिहाय सर्वाधिक सदस्य नोंदणी करणाऱ्या शिवसैनिकांचा शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या वतीने सत्कार करण्यात येईल.
आपली शिवसेना ॲप लोगो

आपली शिवसेना - अधिकृत ॲप

नागरिक आणि कार्यकर्त्यांना जोडणारा पक्षाचा हक्काचा व प्रगत डिजिटल प्लॅटफॉर्म

सोशल मीडिया डॅशबोर्ड

हे ॲप फेसबुक किंवा ट्विटरसारखेच असेल. यात नागरिक आणि कार्यकर्ते स्वतःची प्रोफाईल बनवू शकतील, एकमेकांना फॉलो करणे, पक्षाच्या पोस्ट टाकणे, लाईक आणि कमेंट करणे शक्य होईल.

कार्यकर्त्यांचे 'डिजिटल रिपोर्ट कार्ड'

कोणता कार्यकर्ता ग्राउंडवर काय काम करत आहे, हे पाहण्यासाठी प्रत्येकाची वेगळी प्रोफाईल असेल. कार्यकर्ते त्यांनी केलेली कामे (उदा. रस्ते, मदत) 'Before & After' फोटोंसह इथे अपलोड करू शकतील.

इमर्जन्सी 'SOS' बटण

एखाद्या नागरिकाला अचानक अडचण आल्यास (उदा. वैद्यकीय मदत), ॲपमधील SOS बटण दाबताच त्यांच्या GPS लोकेशननुसार सर्वात जवळच्या ५ शिवसैनिकांना लगेच अलर्ट जाईल. यामुळे पक्षाची मदत सर्वात आधी पोहोचेल.

गुप्त तक्रार पेटी (Anonymous Complaint)

नागरिकांना स्वतःचे नाव आणि नंबर लपवून स्थानिक समस्यांची किंवा गैरप्रकारांची थेट वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार करता येईल. यामुळे पक्षात आणि प्रशासनात पारदर्शकता वाढेल.

व्हेरिफाईड बॅज आणि रँकिंग

जे कार्यकर्ते ॲपवर ॲक्टिव्ह राहून लोकांचे जास्तीत जास्त प्रश्न सोडवतील, त्यांना सिस्टीम आपोआप 'Verified / Top Performer' अशी बॅज देईल. यामुळे खऱ्या कार्यकर्त्यांना पक्षात योग्य ओळख मिळेल.

स्मार्ट फिल्ट्रेशन (Smart Search)

नागरिक त्यांच्या राज्य, जिल्हा, तालुका किंवा प्रभागानुसार कार्यकर्त्यांची यादी फिल्टर करू शकतील. तसेच विशिष्ट नेत्याचा ID टाकून त्यांची पूर्ण माहिती एका क्लिकवर पाहता येईल.

AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) चे प्रगत फीचर्स

AI कामाची समरी:

एखाद्या नेत्याची प्रोफाईल उघडल्यावर शेकडो पोस्ट वाचण्याची गरज नाही. AI एका सेकंदात त्या नेत्याच्या वर्षभराच्या कामाची ५-६ ओळींत 'समरी' देईल (उदा. 'यांनी १० पाणी प्रश्न सोडवले').

ऑटोमॅटिक तक्रार वाटप:

नागरिकांनी टाकलेली तक्रार (पाणी, रस्ते इ.) AI स्वतः वाचून ओळखेल आणि ती थेट संबंधित विभागाच्या कार्यकर्त्याला पाठवेल.

श्री. प्रकाश राठोड

श्री. प्रकाश शिवाजी राठोड

अल्प परिचय
  • मा. सहाय्यक आयुक्त, भिवंडी महानगरपालिका, ठाणे
  • 'विशेष कार्यकारी अधिकारी' महाराष्ट्र शासन
  • अध्यक्ष :- सेवा फाऊंडेशन, महाराष्ट्र
  • अध्यक्ष :- महाशेतकरी संघटना, सोलापूर
  • राष्ट्रीय प्रवक्ता :- राष्ट्रीय बंजारा परिषद

माझ्या तमाम कडवट शिवसैनिकांना जय महाराष्ट्र..!

मी प्रकाश राठोड गेले २५ वर्षे ठाणे या ऐतिहासिक आणि पवित्र भूमीत वास्तव्यास आहे. या भूमीने अनेक चळवळी घडवल्या, अनेक लढे पाहिले. आणि याच ठिकाणी बाळासाहेब ठाकरे साहेबांनी स्थापन केलेली शिवसेना कशी वाढली, कशी रुजली हे मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहे.

माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा अभिमान म्हणजे मला आनंद दिघे साहेबांचा सहवास लाभला. त्यांचे विचार, त्यांची कार्यपद्धती आणि जनतेसाठीची तळमळ हे माझ्या कामाचा पाया आहे. म्हणूनच मी शिवसेनेच्या विचारधारेशी प्रेरित होऊन, महाराष्ट्र हितासाठी माझ्या नोकरीची १० वर्षे सेवा बाकी असताना सुद्धा स्वेच्छा निवृत्ती (VRS) घेऊन शिवसेनेत सक्रिय झालो आहे.

आज मी उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आणि बंजारा समाजाचे नेते तथा शिवसेनेचे कार्यकुशल मंत्री मा. ना. संजयभाऊ राठोड यांच्या सोबत काम करत आहे, हि माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

मी एक साधा शिवसैनिक आहे, पण मनात एक मोठं स्वप्न आहे... शिवसेना मनामनात, शिवसेना घराघरात !

याच उद्दिष्टाने आपण सर्वांनी एकत्र येऊन हे महाअभियान संपूर्ण महाराष्ट्रभर राबवायचे आहे. हे फक्त अभियान नाही, हा आपल्या विचारांचा प्रसार आहे. हा आपल्या संघटनेचा विस्तार आहे. मी सर्व शिवसैनिक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मनापासून आवाहन करतो की या अभियानात सक्रिय सहभागी व्हा.

चला, एकत्र येऊया, शिवसेना अधिक बळकट करूया !

आपलाच,
श्री. प्रकाश राठोड
(विशेष कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र शासन)